Breaking News

गुडन्यूज! रायगडातील 56 जण कोरोनामुक्त

रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 95 जणांचीही प्रकृती उत्तम

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी एक हजार 150 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तपासणीअंती 966 नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 155 जणांना करोना लागण झाली असून, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 56 रुग्णांनी कोरोनाला हरवून माणसाची जगण्याची जिद्द सिद्ध केली आहे. या रुग्णांना रुग्णालयातून बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे. दुर्देवाने चार जणांचे जगण्याचे प्रयत्न असफल झाले.
जिल्ह्यातील पनवेल महापालिका हद्दीत उपजिल्हा रुग्णालय पनवेल 72, सेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई 3, रिलायन्स रुग्णालय नवी मुंबई 2,  एमजीएम रुग्णालय कामोठे 3, हिंदू महासभा रुग्णालय 2, नायर रुग्णालय मुंबई 1, बॉम्बे हॉस्पिटल 1, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे 1,  फोर्टिज हॉस्पिटल नवी मुंबई 2 (उत्तम), सायन रुग्णालय मुंबई 2, डी. वाय. पाटील रुग्णालय नवी मुंबई 3, सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई 2, हिंदूजा रुग्णालय मुंबई 1 अशा एकूण 95 कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती उत्तम असून तेही लवकरच पूर्ण बरे होऊन घरी परततील, अशी सुचिन्हे आहेत. 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply