Breaking News

सिडको वसाहतीत मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर; कळंबोलीत रस्ते दुरुस्ती, नाले, गटार सफाई

कळंबोली : प्रतिनिधी

सिडकोने विकसित केलेल्या शहरात मान्सूनपूर्व कामांना युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. कळंबोली शहरातील रस्ते चकाचक करण्यात आले असून नाले व गटार सफाईच्या कामांना गती देण्यात आली आहे. सिडकोचे अधिक्षक अभियंता सिताराम रोकडे हे राज्यात कोरोनाची महामारी असताना पावसाळ्यात पनवेलमधील जनतेला कोणत्याही अडचणी येवू नयेत म्हणून येथील जनतेला सुविधा देण्यासाठी जातीने लक्ष देत आहेत.

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कामे, उद्योग ठप्प आहेत. या महामारीत पावसाळा जवळ आला असल्याने शहरातील नाले, गटार सफाई, रस्त्यांची डागडुगी व फुटपाथची दुरूस्ती ही मान्सूनपूर्व कामे होणे आवश्यक आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात आली नाहीत तर नाले, गटारे तुंबली जावून संपूर्ण शहरात पाणीच पाणी होवून नागरिकांचे मोठे नुकसान होवून रोगराई व साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. फुटपाथची दुरूस्ती करण्यात आली नाही त्यात नागरिक पडून जीवात हानी होण्याची भीती आहे. मान्सूनपूर्व कामात रस्त्यांची डागडुगी करण्यात करण्यात आली नाही तर नागरिकांचा प्रवास खड्यातून होणार आहे याची चिंता नागरिकांना लागली होती. 

शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने कोरोनाच्या महामारीत मान्सूनपूर्व कामे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोरोनाच्या आणीबाणीत, कोविड 19च्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सुद्धा सिडकोचे अधिक्षक अभियंता सिताराम रोकडे आपली जबाबदारी जीव धोक्यात घालून पार पाडताना दिसून येतात. पावसाळ्यात येथील जनतेची गैरसोय होवू नये, त्यांना कोणत्याही अडअडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून शहरातील नाले, गटार सफाई, फुटपाथ दुरुस्ती व रस्त्यांचे डांबरीकरण ही मान्सूनपूर्व कामे जातीने लक्ष घालून करून घेत आहेत. कळंबोली शहरातील रस्त्यांना गुळगुळी आली असून नाले, गटार सफाई व फुटपाथ दुरूस्तीची कामे लवकरच होणार आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply