Breaking News

मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. राज्यातील सत्ताधारी नेत्यांमध्येही इच्छाशक्ती दिसून येत नाही, असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातील आधीच्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोग नेमला. गायकवाड आयोगाने दिलेल्या अहवालात राज्यातील 70 टक्के मराठा समाज मागास असल्याचे म्हटलेय. दुसरीकडे सरकार ईसीबीसी सवलती लागू करते. हा कोर्टाचा अवमान आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या सारथीसारख्या संस्था अखेरच्या घटका मोजताहेत, अशी टीकाही उदयनराजेंनी राज्य सरकारवर केली.

Check Also

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी …

Leave a Reply