Breaking News

नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या शिष्टमंडळाची जेएनपीटीला भेट

नवी मुंबई ः प्रतिनिधी : नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 19 सदस्यांनी जेएनपीटी ला भेट दिली ज्यामध्ये भारतीय नागरी व सेनादलातील वरिष्ठ अधिकारी, तसेच मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या म्यानमार, यूएसए नौसेना, इजिप्त, श्रीलंकासारख्या परकीय देशांतील अधिकार्‍यांचा समावेश होता. अभ्यासक्रमाचा एक भाग म्ह्णून राज्याच्या आर्थिक विकासाचा आढावा घेणे तसेच देशाच्या विकासाशी निगडीत विविध पैलूंचा अभ्यास करण्याच्या हेतूने मुख्य संस्थाना भेट देण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. राज्य आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देणार्‍या देशातील अव्वल असणार्‍या जेएनपीटीला त्यांनी भेट दिली.

जेएनपीटी भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असून शिष्टमंडळासाठी महत्वपुर्ण अभ्यास स्थळ असणार आहे कारण पोर्ट अशा वातावरणात कार्यरत आहे जिथे सरकार जागतिक मेरीटाईम बाजारपेठ व समुदाय मोठ्या प्रमाणावर एकाच इको सिस्टीमचा भाग आहेत. त्यामुळे इकोसिस्टम मध्ये वाढ आणि एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कौशल्य आणि अतिशय रणनीतिक दृष्टीकोन अंमलात आणणे शक्य दिसून येते. प्रतिनिधींना अशा कामाच्या वातावरणाचा आधीपासूनच अनुभव असून येथून प्रेरणा घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यावसायिक भूमिकेमध्ये पुढे मदत होऊ शकेल.

बंदराच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी व व्यवसायाचे प्रमाण पाहण्यासाठी प्रतिनिधींनी पोर्टला भेट दिली. यानंतर जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखालील चर्चासत्रात त्यांनी देशाच्या आर्थिक चित्रामध्ये जेएनपीटीची भूमिका आणि जागतिक बाजारपेठेतील त्याचे योगदान याबद्दल मूल्यांकन केले. या चर्चासत्रामध्ये बंदरांच्या प्रगतीचा वेग, परिचालन कार्यक्षमता आणि आयात निर्यात समुदायाचा व्यवसाय सुरक्षित,आर्थिक व सोयीस्कर व्हावा यासाठी अवलंबलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकण्यात आला. पायाभूत सुविधांचा विकास प्रगतीपथावर असून ज्यामध्ये पोर्ट्सला रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक व्यवहार्यपूर्ण करण्यासाठी समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर तसेच हिंटरलँड शी सुयोग्यरीत्या जोडण्यासाठी ड्राय पोर्ट्स चा विकास करण्यात येत असून ज्यामुळे भारतातील बंदरे व मेरीटाईम क्षेत्राला महत्व येणार आहे.

नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) ही आशियातील एक प्रमुख संस्था आहे. या संस्थेची भूमिका राष्ट्रीय संरक्षणाच्या धोरणात्मक, आर्थिक, वैज्ञानिक, राजकीय आणि औद्योगिक बाबींशी संबंधित वरिष्ठ सेवा आणि नागरी सेवा अधिकार्‍यांना संयुक्त प्रशिक्षण आणि सूचना पुरविण्याचे आहे. तसेच  राष्ट्रीय सुरक्षा आणि संबंधित क्षेत्रातील वरिष्ठ पदांची भरती करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि पार्श्वभूमीसह भविष्यातील निर्णय घेणार्यांना देखील मदत करण्याचे कार्य करते. ’राष्ट्रीय सुरक्षा आणि रणनीतीचा अभ्यास’  या त्यांच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून हा दौरा आयोजित केला होता.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply