Sunday , September 24 2023

फिफाच्या कार्यकारी समितीवर प्रफुल्ल पटेल यांची निवड

क्वालालंपूर : वृत्तसंस्था

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीत निवड झालेले पहिले भारतीय म्हणून बहुमान मिळविलेल्या पटेल यांना 46 पैकी 38 मते मिळाली.

आशियाई फुटबॉल संघटनेकडून (एएफसी) पाच सदस्यांची फिफा समितीत निवड झाली. त्यात एएफसीचे अध्यक्ष आणि एका महिला सदस्याचा समावेश आहे.

क्वालालंपूरमध्ये शनिवारी एएफसीच्या 29व्या काँग्रेसदरम्यान ही निवडणूक झाली. सदस्यांची निवड 2019 ते 2023 दरम्यान चार वर्षांच्या कालावधीसाठी झाली आहे. पटेल यांच्याशिवाय समितीत अल-मोहन्नदी (कतार), खालीद अवाद अल्तेबिती (सौदी अरब), मारियानो वी. अरनेटा जुनिअर (फिलिपाईन्स), चुंग मोंग ग्यु (कोरिया), दू झोकाई (चीन), मेहदी ताज (इराण) आणि कोहजो तशिमा (जपान) यांची उमेदवारी होती. त्याआधी शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांना एएफसीचा अध्यक्ष पुन्हा निवडण्यात आले. त्यांचा चार वर्षांचा नवीन कार्यकाळ हा 2023 पर्यंत असेल. या वेळेस त्यांच्या उमेदवारीला आव्हान देणारा कोणीही नव्हता.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply