उरण ः दिनेश पवार : येथील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून योग आहारच्या वतीने शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मनोज गॅलेक्सी नागाव (म्हतावली) येथे महिलांसाठी मोफत योग शिकविण्यात आला. योग ट्रेनर प्राजक्ता सरवैया यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या रोजच्या आहाराविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी विचारलेल्या शंकांना मुद्देसूद उत्तरे देण्यात आली. महिलांनी योगा कसा करावा, त्याचे फायदे कोणते, आपल्या आहारात काय महत्त्वाचे आहे, वेळेवर जेवण केल्यास कोणते फायदे होतात, योगा नियमित केल्याने आरोग्य कसे राहते, योगा का करावा असे विविध फायदे योग ट्रेनर प्राजक्ता सरवैया यांनी सांगितले.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …