Breaking News

उसर येथे पहारेकर्यावर हल्ला

रेवदंडा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा

रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोना संसर्ग रोगाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने अलिबाग तालुक्यातील उसर येथे गावात येणार्‍या व जाणार्‍या लोकांवर लक्ष्य ठेवण्यासाठी गावकीने नेमलेल्या पहारेकरावर हल्ला केल्याबद्दल रेवदंडा पोलीस ठाणे येथे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे उसर येथे कोरोना संसर्ग रोगाच्या अनुषंगाने सुरक्षीततेच्या दृष्टीने गावकीने गावात येणार्‍या व जाणार्‍या लोकांवर लक्ष्य ठेवण्यासाठी उसर गावातील 36 वर्षीय संदिप पाडेकर यांना पहारेकरी नेमले होते. उसरमधील आनंद शिंदे याच्या घरासमोर खुर्चीत बसून ते 14 मे रोजी सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेसाठी गावात येणार्‍या व जाणार्‍या लोकांवर लक्ष्य ठेवून होते, उसर गावातील निलेश

गायकर (40), अकलेश शिंदे (32), अभिलाषा शिंदे (27), अक्षय शिंदे (23), आत्माराम शिंदे (64) यांनी संगणमत करून जमावबंदीचे आदेश मोडून संदिप पाडेकर बसलेल्या ठिकाणी येऊन तुला येथे कोणी नेमले, असे फिर्यादीस बोलून त्यांचे डोक्यात खुर्ची टाकली व हाताबुक्काने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली, अशी तक्रार संदिप पाडेकर यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे नोंदविली.

त्यानुसार रेवदंडा पोलीस ठाणे येथे संदिप पाडेकर यांचे फिर्यादीनुसार निलेश गायकर, अकलेश शिंदे, अभिलाषा शिंदे, अक्षय शिंदे, आत्माराम शिंदे यांचे विरोधात भादविकलम 324, 143, 147, 149, 323, 504, 506 मुंबई अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार 1388 म्हात्रे हे पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply