Breaking News

नवी मुंबईत आढळले 80 नवे रुग्ण; एकूण संख्या 1128

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 16) कोरोनाचे 80 नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1128 झाली आहे.  आठवडाभर चढत्या क्रमाने वाढत असलेला आकडा मंगळवारपासून उतरत्या क्रमावार आला होता, मात्र गुरुवारपासून सलग तीन दिवस पुन्हा आकडा वाढताना दिसत आहे.

मुख्य म्हणजे एपीएमसी मार्केट सात दिवस बंद केल्याने काही प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र ती फोल ठरताना दिसत आहे. आजतागायत 8121 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून एकूण 6080 जण निगेटिव्ह आढळले आहेत. तर अद्यापही 913 अहवाल प्रलंबित आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह अहवाल येऊन 95 व्यक्ती बर्‍या झाल्या असून आतापर्यंत ही संख्या 367 झाली आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शनिवारची बाधितांची विभागवार अकडेवारी लक्षात घेतल्यास बेलापूर 6, नेरुळ 12, वाशी 9, तुर्भे 25, कोपरखैरणे 15, घणसोली 7, ऐरोली 6 व दिघा 0 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply