पनवेल : वार्ताहर – चार दिवसांपूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता परिमंडळ दोन अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांची टप्पाटप्प्याने कोविड तपासणी सुरू करण्यात आली आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या एका कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर दोन महिला कर्मचार्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे त्यांनासुद्धा पुढील उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीन कर्मचार्यांच्या सानिर्ध्यात अजुनही काही कर्मचारी व अधिकारी येण्याची दाट शक्यता असल्याने प्रथम संपूर्ण पोलीस ठाणे सॅनिटाईज करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तेथील अधिकारी व कर्मचार्यांची टप्पाटप्प्याने कोविड तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अशी लागण इतर पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकार्यांना होऊ नये यासाठी ते आता पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांचीसुद्धा आता तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत.