उरण : प्रतिनिधी
देशातील शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली असल्याने त्याचा मनस्ताप जनतेला वारंवार सोसावा लागत आहे. या भ्रष्टाचाराचा बंदोबस्त कसा करावा या अनुषंगाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींचे उरणच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यासमोर भ्रष्टाचारविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.
आज शासकीय यंत्रणेत जनतेला लहानशा कामासाठी लाच द्यावी लागते. त्याशिवाय शासकीय कर्मचारी कागदपत्रे हलवीत नाहीत याचा मनस्ताप जनतेला नेहमीच सोसावा लागत आहे. त्यांचा हक्क असूनही न्याय मिळविण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे आणि ही भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून मोठे काम केले जात आहे. यामधील जनतेला काही माहीत नसल्याकारणाने जनता भ्रष्टाचाराला बळी पडून खतपाणी घालत आहे. यामुळे वाशी नवी मुंबई भ्रष्टाचार निर्मूलन समिती (अँटी करप्शन ब्युरो)च्या माध्यमातून (मॉडर्न कॉलेज) कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत या विषयावर आज उरण येथे जनजागृती केली, तसेच तरुणांना मिळविण्यासाठी देऊ लागणारी लाच त्या शिवाय नोकर्या मिळत नाही. तहसील कार्यालयात ऑनलाईन असतानाही कामे होण्यासाठी कशी लाच द्यावी लागत आहे, या संदर्भात पथनाट्यद्वारे सादरीकरण
करण्यात आले.
लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा आहे, भ्रष्टाचाराला जनतेने सहकार्य करू नये, भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करावा, असे आवाहन या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केले. या विद्यार्थ्यांच्या आकर्षक पथनाट्याद्वारे या शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांबरोबर उपस्थित नागरिकही भारावून गेले होते. या पथनाट्य सादरीकरणामुळे लोकसेवकांकडून करण्यात येणार्या भ्रष्टाचाराला आळा बसण्याला मदत होईल. यादृष्टीने हे पथनाट्य सादरीकरण करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.