पनवेल : वार्ताहर
प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते शुक्रवार या दिवशी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोल नाक्याच्यानंतर कि. मी. 33.00 ते कि. मी. 39.000 दरम्यान मिसिंग लिंक या प्रोजेक्ट अंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी नियंत्रित स्फोट घडविण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. या कालावधीत रस्त्यावरुन प्रवास करणार्या वाहनांसोबत दुर्घटना घडू नयेत याकरिता वाहने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील दोन्ही लेनची वाहतूक दुपारी 12 ते 12.30 व 3.30 ते 4.30 वा. दरम्यान वाहतूक थांबवून ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे लेनवरील वाहने खालापूर टोल नाका येथे व मुंबई लेनवरील वाहने कि. मी. 39.500 येथे थांबविण्यात येणार आहे. तरी या कालावधीत प्रवास करणार्या वाहन चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महामार्ग पोलीस पनवेल विभागाचे पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी केले आहे.