Breaking News

राज्य सरकार जबाबदारी टाळतेय -आमदार गणेश नाईक

नवी मुंबई : बातमीदार

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणाबाहेर जाण्यास राज्य सरकारमधील असमन्वय कारणीभूत असून सरकार केवळ जबाबदारी टाळण्याचे काम करीत आहे, असा आरोप आमदार गणेश नाईक

यांनी केला.

कोरोनाला आळा घालण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे. याविरोधात भारतीय जनता पक्षाने राज्यात माझे अंगण माझे रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक दिली होती. सोशल डिस्टन्स पाळून नवी मुंबईत सर्वत्र हे आंदोलन करण्यात आले. आमदार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपरखैरणे सेक्टर 11 येथील बालाजी गार्डन सोसायटीमध्ये महाराष्ट्र बचाव आंदोलन पार पडले. त्यावेळी त्यांनी आपले मत मांडले. या वेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, युवा नेते संकल्प नाईक आदींसह सोसायटीमधील अनेक नागरिक सहभागी

झाले होते.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply