Breaking News

आगे आगे देखो होता है क्या!

दिग्गजांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

मुंबई : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकण्याचा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातले दिग्गज नेते भाजपमध्ये येणार असल्याचे सूतोवाच करीत ‘आगे आगे देखो होता है क्या’ असा इशारा दिला आहे, तसेच भाजपच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. 

प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील एकूण लोकसभेच्या जागांपैकी रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकण्याचा दावा केला, तसेच विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असून, वाट पाहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर शरद पवार काय बोलले मला माहीत नाही, पण त्यांनीच विपर्यास केल्याचेही म्हटले आहे. यामुळे एकूणच ते संभ्रम स्थितीमध्ये असल्याचे दिसत असल्याचा टोला त्यांनी पवार यांना लगावला. हवाई हल्ला झाल्याचे मान्य केले; तर त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाईल याचीही त्यांना भीती असल्याचे फडणवीस म्हणाले. 

लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती करताना आरपीआयचे रामदास आठवलेंच्या पक्षाला विचारात घेतले नसल्यावरूनही फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, रामदास आठवले यांच्या पक्षाला लोकसभेत जागा दिली जाणार नाही, पण विधानसभेत त्यांचे व्यवस्थित समाधान करणार आहोत.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply