Breaking News

श्रीमंत असूनही जमिनीवर पाय सलेले निगर्वी नेतृत्व

अनेकांच्या डोक्यात पैसा आणि सत्तेची नशा जाताना मी पाहिली आहे, पण वडिलोपार्जित श्रीमंती असूनही जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणजे सिडकोचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर. आपले वडील, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा राजकीय वारसा घेऊन आलेले राजकारणातील नेतृत्व असल्याने सामान्य कार्यकर्ते आमदार म्हणजे आपला घरचा समजून त्यांच्याकडे कामे घेऊन जातात. प्रशांतजीसुद्धा त्यांना शक्य असलेली मदत करतात, असा आपला अनुभव असल्याचे ज्येष्ठ स्वयंसेवक नंदाजी ओझे यांनी सांगितले. ते ‘रामप्रहर’च्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पनवेलमधील ज्येष्ठ स्वयंसेवक नंदकुमार ओझे ज्यांच्याकडे रायगड आणि ठाणे जिल्ह्याची जबाबदारी संघाने अनेक वर्षे दिली होती. त्यांनी रायगड आणि ठाण्यात भारतीय मजदूर संघटनेचे काम केले. आता वयाच्या 78व्या वर्षी ते फक्त सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही भाग घेतला होता. विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत दि. बा. पाटील यांचे काम केले होते. त्यानंतरही शेकापला आम्ही मदत करीत होतो, म्हणजे त्यांची नीती आम्हाला मान्य होती असे नसल्याचे ते सांगतात.

श्री. ओझे यांनी आठवणी उलगडताना सांगितले की, आपली पत्नी पनवेलमध्ये भाजपची प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आली, तरी पनवेल हा भाजपसाठी खडकाळ तालुकाच होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विजयानंतर आपल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात असलेले आमदार प्रशांत ठाकूर प्रथम माझ्या घरी आले. त्या वेळी त्यांनी मी तुमचा उंबरठा ओलांडून घरात येतोय, असे सांगितले. मी त्यांचा मनातील विचार ओळखून त्यांचे स्वागत केले. तुमचा निर्णय पनवेल तालुक्यासाठी आणि राज्याच्या भविष्यासाठी चांगला असल्याचे त्यांना म्हटले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यांनी संघाच्या कार्याची माहिती आत्मासात केली. आज ते एखाद्या मुरलेल्या संघाच्या कार्यकर्त्याप्रमाणे पक्षात काम करीत आहेत.

पनवेलमध्ये असलेल्या आयटीआयचा वापर करून येथील तरुणांना येथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमदार म्हणून त्यांचे व्हीजन होते. तरुणांच्या व्यवसायवृद्धीसाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ते तरुण त्यांचे कार्यकर्ते बनले आहेत. पनवेलमध्ये महापालिका स्थापन करण्यापासून येथील रस्ते आणि मूलभूत सुधारणा करताना त्यांनी भविष्यात पनवेल शहराची होणारी वाढ कशी असेल याचा दूरदृष्टीचा वापर करून केलेला विचार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटत होते, पण येथील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना सिडकोचे अध्यक्षपद मिळाले असेच म्हणावे लागेल. त्याचा फायदा त्यांनी विस्थापितांना नक्कीच करून दिला. अनेक प्रश्न मार्गी लागले. महापालिकेत सिडको हद्दीतील प्रभाग हस्तांतर करताना येणार्‍या अडचणी दूर करणे शक्य झाले. साडेबारा टक्के भूखंड वाटप, गरजेपोटी विस्तार केलेल्या घरांचा प्रश्न यासारखे प्रश्न मार्गी लागत असल्याचे पाहायला मिळतात.

मी माझ्या आयुष्यात स्वप्नातही पाहिले नव्हते असे यश पनवेल तालुक्यात भाजपला मिळाले आहे. आज पनवेलमध्ये भाजपशिवाय कोणीही शिल्लक नाही. अशी परिस्थिती माझ्या वयाच्या 78व्या वर्षी पाहत आहे. निवडणुका मी आबासाहेब पन्हाळकरांपासून पाहत आहे. त्यांचा पराभव दि. बा. पाटील यांनी केला. आम्हाला शेकापवाले नेहमी सांगायचे आमच्या जेवढ्या बैलगाड्या पनवेलमध्ये येतील त्यापेक्षा तुम्हाला एक एक मत कमी पडेल. आमच्यासाठी पनवेल एवढा खडकाळ तालुका होता. आता प्रशांत ठाकूर यांनी एवढे काम केले आहे की आज त्यांना विरोध करणे शक्य नाही. त्यामुळे या वेळी त्यांचा विजय लाखापेक्षा जास्त मतांनी होईल. त्यांच्यासमोर उभा करायला विरोधकांकडे सक्षम उमेदवारच नाही.

प्रशांत ठाकूर यांचे वैयक्तिक चारित्र, रामशेठचे कार्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व, अमित शहा व मोदींची भाजपवर असलेली कमांड, देवेंद्र फडणवीस यांचे कणकर नेतृत्व आणि प्रशांतजींसारखे कार्य यामुळे आज भाजपला पनवेलमध्ये पर्याय उरलेला नाही. वयाने लहान असूनही प्रशांतजींना एवढे मोठे यश मिळाले ते त्यांची समाजासाठी काही तरी करून दाखवण्याची वृत्ती आणि त्यांची दूरदृष्टी यामुळे. त्यांना परमेश्वराने दीर्घायुष्य द्यावे हीच इच्छा!

-नंदाजी ओझे, ज्येष्ठ स्वयंसेवक,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पनवेल

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply