Breaking News

राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे सुयश

नवी मुंबई : बातमीदार
अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सिनिअर अ‍ॅण्ड मास्टर किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील 30 खेळाडूंनी सहभाग घेत सहा सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली. सुमारे 30 जिल्ह्यांतील 900पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धा महाराष्ट्र किकबॉक्सिंग अससोसिएशचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या स्पर्धेत नवी मुंबईतील किकबॉक्सिंगपटू सुरज पुजारी, मानसी पवार, स्विटी परेरा, पायल सक्सेना, आर्यन चव्हाण व सिद्धारत कुडवा यांनी सुवर्ण, आदिल मन्या व अंकिता सिंग यांनी रौप्य, तर आदित्य अडांगळे, अथर्व जोशी, लक्ष्य शर्मा, प्रफुल्ल सरगर, साहिल कदम व सत्यम सोंकर यांनी कांस्यपदक पटकाविले.
यापैकी सुवर्णपदक मिळवलेले खेळाडू 18 ऑगस्ट रोजी चेन्नई येथे होणार्‍या राष्ट्रीय सिनिअर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या खेळाडूंना सुरज पुजारी व नवी मुंबई किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आशिष यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply