उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील सोनारी गावाचे माजी सरपंच तथा भाजपचे महालन विभाग अध्यक्ष महेश कडू आणि सोनारी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनेश तांडेल यांनी स्वखर्चाने सोनारी गावातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप केले आहे.
कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरुध्द प्रतिबंधात्मक औषध म्हणून अर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध सुचविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महेश कडू व दिनेश तांडेल यांनी स्वखर्चाने सोनारी गावातील नागरिकांना गोळ्यांचे वाटप केले.
तसेच त्यांनी या अगोदर उरण तालुक्यातील गरीबांना, आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू, डॉक्टरांना मास्क, सॅनिटायझर, मेडिकल साहित्याचे वाटप केले होते. आणि आता पुन्हा स्वखर्चाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्सेनिक अल्बम 30 या औषधांचे वाटप हजारो नागरिकांना केले.
ज्या नागरीकांना अर्सेनिक अल्बम 30 औषध मिळाले नसेल त्यांनी महेश म्हात्रे (मो.9594407471) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महेश कडू व दिनेश तांडेल यांनी केले आहे.
तळोजा : कोरोना विषाणूशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची आहे. त्या अनुषंगाने साई बहुउद्देशीय मित्र मंडळाचे पदाधिकारी व साई सुरक्षा रक्षक एजन्सीचे मालक राजेंद्र पाटील यांच्या वतीने एमआयडीसी मधील कामगार, वाहन चालक, सुरक्षा रक्षकांना अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.