अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकश श्रीधर पावसकर यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या स्पर्धा समितीवर निवड झाली आहे. एमसीएची बैठक नुकतीच झाली. यात स्पर्धा समितीमध्ये पावसकर यांची निवड करण्यात आली. पावसकर हे रायगड जिल्हा क्रिकेट आसेसिएशनमध्ये 15 वर्षे कार्यरत आहेत.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, सेक्रेटरी विवेक बहुतूले, कार्योपाध्यक्ष जयंत नाईक, राजेंद्र भावे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य तसेच अलिबाग क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकार्यांनी पावसकर यांचे ‘एमसीए’वर निवडीबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …