कर्जत : प्रतिनिधी
शहरातील मृदुल विलास चंदन या विद्यार्थीनीने वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी असणार्या नीट परीक्षेत 99.81 टक्के गुण मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतात तिची रँक 3146 आहे. तिला एमबीबीएस व्हायची इच्छा आहे. मृदुल चंदन ही कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियमची विद्यार्थिनी असून तिने चौथी व आठवीमध्ये शिष्यवृत्ती मिळविली होती. शालांत परीक्षेत तिने 95 टक्के गुण मिळविले होते. तर बारावी परीक्षत 94.17 टक्के गुण मिळविले होते. मृदुलचे वडील बांधकाम व्यावसायिक असून काकी नगरसेविका आहेत. तिचे मामासुद्धा नगरसेवक आहेत. मृदुलचे चुलत आजोबा रमेश चंदन हे कर्जतचे पहिले नगराध्यक्ष होते. नीट परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकार्यांनी मृदुल चंदन हिच्या निवासस्थानी तिचा सत्कार करून अभिनंदन केले.