Breaking News

चक्रीवादळामुळे 20 घरांचे नुकसान

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात चक्रीवादळामुळे सुमारे 20 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने येथील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे. बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्याला चांगला फटका बसला आहे. तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोंधळपाडा गावात प्राथमिक अंदाजानुसार 15 ते 20 घरांचे प्रचंड नुकसान झाले. वार्‍यामुळे छप्पर, पत्रे उडाले. काही ठिकाणी चिंच, आंबा आदी झाडे पडल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अलिबाग तालुक्यातील इतर लहान-मोठ्या गावांनाही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसून अतोनात नुकसान झाले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply