कर्जत : प्रतिनिधी
सॅनिटायझर हा शब्द आपण यापूर्वी कधीतरी ऐकलेला असेल, परंतु कोरोनाच्या महामारीदरम्यान सॅनिटायझरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या सर्रास हात सॅनिटाइझ करून घ्यावे लागतात, पण प्रत्येकाच्या हाताचा स्पर्श सॅनिटायझरपात्राला होतो. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील चार अभियांत्रिकी युवकांनी स्पर्श न होता हात सॅनिटाइझ होतील असे टचलेस हॅण्ड सॅनिटायझर मशीन तयार केले आहे.
देशात हळूहळू लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने दुकाने, बँका, ऑफिसेस सुरू झाले आहेत, पण अजूनही देशावरील कोरोनाचे संकट गेलेले नाही. कर्जतमधील बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर दीपाली दंडारे आणि सहकारी सौरभ पणशीकर यांना कोरोनामुळे बँकेमधील गर्दी तसेच कर्मचार्यांची सुरक्षा याबद्दल चिंता होती.
तेजस गिरी, प्रतीक कदम, शुभम राजगुरू आणि गिरीष जोरी यांनी बँकेसाठी एक मशीन भेट देऊ केली आणि या मशीनचे प्रात्यक्षिक ग्राहकांच्या उपस्थितीत सादर केले. तुम्ही तुमचा हात या मशीनखाली हवेमध्ये ठेवल्यावर मशीन स्वतःहून तुमच्या हातावर सॅनिटायझरची फवारणी करते. याबद्दल या युवकांचे कौतुक होत आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …