कर्जत : प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कर्जत प्रखंडाच्या वतीने दीपावलीच्या मुहूर्तावर तालुक्यातील बामणोली, आषाणे, चेडोबावाडी, भिसेगाव, नांगुर्ले, पळसदरी, तळ्याचीवाडी या आदिवासी वाड्यांमधील सुमारे 250 कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आला. बजरंग दलाचे साईनाथ श्रीखंडे, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख महेश बडेकर, कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, बजरंग दल संयोजक कमलाकर किरडे, धर्मप्रसार प्रमुख अनंता हजारे, सचिन ठाकूर, दीपक दळवी, अशोक थोरवे या वेळी उपस्थित होते.