नागोठणे : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागोठणे विभागातील आमडोशी आणि वांगणी या गावांतील नागरिकांना सोमवारी (दि. 15) स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते नुकसानीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
वांगणीतील ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, रोहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सदस्य संजय भोसले, सरपंच सोनम भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, तिरतराव पोलसानी, सिराज पानसरे यांच्यासह ग्रामस्थ तसेच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी 12 जणांना धनादेश वितरित करण्यात आले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper