Breaking News

‘विद्याभवनची कामगिरी कौतुकास्पद’

नवी मुंबई : बातमीदार

पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाचा 21 व्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांनी विद्याभवन शिक्षण संकुलाच्या 21 वर्षांच्या कामगिरीची प्रशंसा केली.

स्व. डॉ. शं. पां. किंजवडेकर आणि संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे यांच्या अथक परिश्रमातून 18 जून 2001 रोजी नेरूळ येथील विद्याभवन संकुलाचा श्रीगणेशा झाला. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम या शाखेतून राबवले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना आणि समाजास लाभ मिळत आहे. शालांत परीक्षांच्या 100 टक्के निकालाची 19 वर्षांची परंपरा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे, असे मत सुनील रेडेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. श्रुती कुलकर्णी या विद्यार्थिनीने राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनात केलेल्या कामगिरीसाठी तिचा सत्कार करण्यात आला.

विद्याभवन शिक्षण संकुलाच्या 21व्या वर्धापन दिन कार्यक्रमात पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, माजी कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे, संचालक राजेंद्र बोर्‍हाडे, दिनेश मिसाळ, माजी विद्यार्थी महामंडळाचे महासचिव तुकाराम दौंडकर, नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या ग्रंथालायाचे अध्यक्ष प्रकाश लखापते, दत्तात्रय रायते, अशोक वंडेकर, मुख्याध्यापिका राजकुमारी इंदलकर, सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनीषा मुळीक माजी मुख्याध्यापक शिवाजी माळी तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना सिंग यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply