पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे देशातील सर्व नागरिकांत चीनविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे चीनचा कोणताही माल खरेदी करायचा नाही, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. याचाच भाग म्हणून भाजपतर्फे चायनानिर्मित टीव्ही, मोबाइल आदी वस्तूंची तोडफोड करून होळी करण्यात आली. यापुढे आम्ही चायनाची वस्तू खरेदी करणार नाही, अशी सर्वांनी शपथ घेतली.
या वेळी भाजप प्रभाग 7चे नगरसेवक अमर पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, कमल कोठारी, भाजप भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, पनवेल तालुक्याचे माजी उपाध्यक्ष राजन पिल्ले, दत्ता बिनवडे, युवा नेते अमर ठाकूर, जमीर शेख, कळंबोली महिला शहराध्यक्ष मनीषा निकम, दुर्गा सहानी, युवा मोर्चाचे नूतन अध्यक्ष गोविंदा झा, सुरेश भास्कर, ब्रिजेश कुमार, व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …