Breaking News

माणगावमधील जुगार अड्ड्यावर छापा

20 जणांना अटक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचवली परिसरातील एका बंद घरात अनधिकृतपणे सुरू असलेला जुगार अड्डा रायगड पोलिसांनी उधळला आहे. 2 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता छापा टाकून केलेल्या धडक कारवाईत 20 जणांना जुगार खेळताना अटक करण्यात आली असून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व वाहने असा पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचवली परिसरातील एका बंद घरात अनधिकृतपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रायगड पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी सूचित केल्यावर पोलीस उपअधीक्षक पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग आर. एम. परदेशी, राखीव पोलीस निरीक्षक शेख, पो. ह. आर. व्ही. चाळके, आर. जी. मार्कडे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता काही इसम तीन पत्ता खेळत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. या वेळी 20 आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून जुगाराच्या साहित्यासह एकूण तीन लाख 76 हजार 320 रुपयांची रोकड तसेच 12 वाहनांसह पाच लाख 73 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या अधिपत्याखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव शशिकिरण काशीद, माणगाव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक आर. एम. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply