Breaking News

वीर वाजेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने ’आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळा झाली.

प्रमुख पाहुणे नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक एम. के. म्हात्रे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. आमोद ठक्कर यांनी केले. एम. के. म्हात्रे यांनी आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यशाळेचे आभार प्रा. डॉ. राहुल पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. आर. पाटील यांनी केले. या चर्चासत्रात प्रा. इनामदार, प्रा. अनुसे, प्रा. डॉ. सोनावले उपस्थित होते. कार्यशाळेत 128 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. आर. एस. जावळे व प्रा. एन. जे. म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply