Breaking News

लाखो शोभिवंत फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग

उरण : प्रतिनिधी – उरण : जेएनपीटी-गव्हाणफाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-4बी आठ पदरी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथारिटी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन लाख विविध प्रकारची आकर्षक शोभिवंत फुलझाडे लावण्यात येत आहेत. या फुलझाडांच्या लागवडीमुळे दररोज या महामार्गावरुन ये-जा करणार्‍या दहा हजार वाहतुकदार, प्रवासी, नागरिकांचा प्रवास निश्चितपणे आकर्षण आणि डोळ्यांना ही सुखावह आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथारिटीचे अध्यक्ष प्रशांत फेगडे यांनी दिली आहे.

जेएनपीटी-मुंबई बंदर रोड कंपनी बंदरातील वाढती अवजड वाहतूक सुकर व्हावी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीटी दरम्यान असलेल्या गव्हाणफाटा-जासई- करळ-द्रोणागिरी दरम्यान राष्ट्रीय एनएच-4 बी महामार्गावर सात उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन हजार कोटी खर्चाचे काम राष्ट्रीय महामार्ग अथारिटीकडे सोपविण्यात आले आहे. यापैकी उड्डाणपूलाची काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर उर्वरित जेएनपीटी-गव्हाण फाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-4 बी राष्ट्रीय महामार्गावरील सहा-आठ पदरी 42 किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

परिसरातील वाढत्या प्रदूषणाचे संतुलन साधण्यासाठी जीव्हीकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या जेएनपीटी दरम्यान असलेल्या गव्हाण फाटा -जासई-करळ-द्रोणागिरी दरम्यान राष्ट्रीय एनएच- 4 बी महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी महामार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकावर सुमारे दोन लाख शोभिवंत फुलझाडे लावण्याची योजना आखण्यात आली आहे.यामध्ये कन्हेरी फुलझाडांच्या जातीतील बिंटी, बोंगणवेल, टिकोमा, तगर, जास्वंद, पॅरेलॉनकस आदी आकर्षक फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी कोट्यांवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रस्ते उभारणीसह फुलझाडांची लागवड आणि देखभाल करण्याचे काम जीव्हीकेकडे सोपविण्यात आले आहे.या 42 किमी लांबीच्या महामार्गावर आणि सहा-आठ पदरी रस्त्यांच्या दुभाजकावर शोभिवंत आकर्षक फुलझाडे लावण्यात येत आहेत. या फुलझाडांच्या लागवडीमुळे दररोज या महामार्गावरुन ये-जा करणार्या दहा हजार वाहतुकदार, प्रवासी, नागरिकांचा प्रवास आकर्षण आणि डोळ्यांना ही सुखावह ठरणार आहे. तसेच जेएनपीटीशी जोडणारे सहा- आठ पदरी रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग शोभिवंत फुलझाडांनी  बहरणार आहेत.

जेएनपीटी दरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरी दरम्यान राष्ट्रीय एनएच-4बी महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी महामार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकावर  शोभिवंत फुलझाडे लावण्यात येत आहेत. या शोभिवंत फुलझाडांच्या लागवडीमुळे महामार्गावरुन ये-जा करणार्‍यांना प्रसन्नता लाभणार आहे.तसेच परिसरात ढासळत्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही मोलाची मदत होणार आहे. याशिवाय दुभंगावर लावण्यात येणार्‍या फुलझाडांमुळे रात्रीच्यावेळी परस्पर विरुध्द धावणार्‍या वाहनांच्या लाईटस्चे रिप्लेक्शन एकमेकांवर न पडण्यास मदत होणार आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईटस् रिप्लेक्शनमुळे होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.

-प्रशांत फेगडे, राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅॅॅॅथॉरिटीचे अध्यक्ष

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply