नागोठणे : प्रतिनिधी
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महिलांचे आरोग्य या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांचे आरोग्य व त्यांना भेडसावत असलेल्या समस्या तसेच महिलांना उद्भवणारे कॅन्सरसारखे भयंकर रोग यावर चर्चा केली. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी योगासनांचे महत्त्व विषद केले व काही योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी प्रास्ताविक केले. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिबा सद्दाम दफेदार आणि साधना गुरव या पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. स्मिता चौधरी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शर्मा हिने केले. डॉ. मनोहर शिरसाठ, डॉ. विकास शिंदे, ज्योती पाटील, चैत्राली पाटील, रुचिता निकम यांच्यासह सर्व स्वंयसेवक विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. अनुजा वाटवे हिने आभार मानले.