Breaking News

आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांची सुरक्षा धोक्यात

रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी – कोरोना संकटाचा सामना करण्याची परिस्थिती सर्वच नागरिकांवर ओढावली आहे. त्यांना स्वतःच्या सुरक्षतेसाठी कोणतेही साधन शासनामार्फत पुरविण्यात आलेले नाही. अल्प वेतनात त्या आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तरी याची दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेऊन त्यांच्या वेतनात वाढ करून त्यांना सुरक्षतेची उपकरणे देण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात गावोगावी होत चालला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जनतेच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत निहाय समित्या स्थापन करून त्यांच्यावर जनतेत जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविली आहे. मात्र यातील काही पदाधिकारी भितीपोटी न जाता ही जबाबदारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना पार पाडावी लागत आहे.

एखादा पेशंट पॉझिटिव्ह आढळला तर त्या ठिकाणी कमिटीमधील एखादं दुसरा पदाधिकारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना घेऊन पॉझिटिव्ह पेशंटच्या नातेवाइकांना क्वारंटाइन करण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करीत असतात. मात्र या आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना वेतन ही अल्प प्रमाणात आहे. तसेच त्यांच्यासाठी कोणीच सुरक्षतेसाठीची मास्क, सॅनिटायझर मिळत नाही. त्यांना स्वतःच खरेदी करून आपली सुरक्षा करण्याची वेळ आली आहे. तसेच जे इतरांच्या जीवावर उदार होऊन सुरक्षा करतात.

वेतनातही वाढ करावी

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणीच विचार करताना दिसत नाहीत. या आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या वेतनात वाढ करून त्यांना सुरक्षेसाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकारी चौधरी यांनी पुरविण्याकडे लक्ष देण्याची मागणी उरणच्या सामान्य नागरीकांकडून करण्यात येत आहे.

Check Also

नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष

नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …

Leave a Reply