पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 13) झाली असून, 342 नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये उरण तालुक्यातील तीन आणि खालापूर, कर्जत, अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुका 205 (महापालिका 146, ग्रामीण 59), उरण 35, पेण 33, अलिबाग 28, खालापूर 18, रोहा 13, कर्जत सात, महाड दोन आणि तळा एक असे आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात दिवसभरात 305 रुग्ण बरे झाले. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आठ हजार पार करून 8056 एवढा झाला असून, आतापर्यंत 219 जण मृत्युमुखी पडले आहेत, तर जिल्ह्यात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 4059 असून, सध्या 3290 रुग्ण सक्रिय आहेत.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …