नवी दिल्ली : कोरोना महामारीतून सावरत असताना देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्याकरिता नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची (एनएआरसीएल) उभारणी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा बुधवारी (दि. 16) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. याविषयी सविस्तर माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, एनएआरसीएलद्वारे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गॅरंटीची तरतूद करण्यात आली आहे. सेक्युरिटी रिसिटसाठी ही गॅरंटी असेल. यंदाच्या अर्थसंकल्पातदेखील असेट्री कन्स्ट्रक्शन कंपनी उभारण्याविषयी घोषणा करण्यात आली होती.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक …