तिघांचा मृत्यू; 43 जणांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 14) कोरोनाच्या 57 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 44 नवे रुग्ण आढळले असून 35 रूग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 13 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. तर आठ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये खारघर, सेक्टर-12, श्रध्दा सोसायटी येथील 73 वर्षीय व्यक्ती आणि सेक्टर-35, खुटूकबांधन, सुखसमृध्दी सोसायटी येथील 70 वर्षीय व्यक्ती तसेच कळंबोली, खिडूकपाडा, भोईर निवास येथील 47 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल 10, कामोठे नऊ, खारघर सात, पनवेल सात, कळंबोली नऊ, तळोजा व खांदा कॉलनीतील आसुडगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण अशा विभागवार समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये कळंबोलीतील 15, खारघरमधील 7, नवीन पनवेलमधील 6, कामोठ्यातील 4 तसेच पनवेलमधील 3 रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, रविवारपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण 972 कोरोनाबाधित रूग्णांपैकी 673 रूग्ण बरे होऊन घरी परतले असून 42 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या 257 अॅक्टीव्ह केसेस आहेत.
पनवेल ग्रामीणमधील आढळलेल्या रुग्णांमध्ये उसर्ली खुर्द, करंजाडे, सुकूपर आणि विचुुंबे येथे प्रत्येकी एक व उलवे येथे नऊ रुग्ण आढळले आहेत. तर विचुंबे येथील दोन, सुकापूरमधील दोन, वावंजे येथील दोन तसेच करंजाडे आणि उलवे येथील प्रत्येकी एका रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल ग्रामीणमधील रविवारपर्यंतच्या एकूण 300 कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण 220 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाच्या 69 अॅक्टीव्ह केसेस आहेत.
उरण तालुक्यात दोन नवे पॉझिटिव्ह
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात रविवारी (दि .14 ) नवीन दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यात चाणजे (तांडेल नगर) येथील 35 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला व उरण-देऊळवाडी एक 45 वर्षीय पुरुष याला कोरोनाची लागण झाली आहे.
उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 181 झाली आहे. त्यातील159 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 21 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यातील कामोठे एमजीएम रुग्णालयात सहा, पनवेल येथील (कोविड) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे सहा व केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडवीरा येथे सहा, डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ एक होम ़क्वारंटाइन दोन अशी एकूण 21 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. करंजा येथील 134 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यातील 131 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे करंजाचे फक्त तीन रुग्ण उपचार घेत आहेत, अशी महिती उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
नवी मुंबईत 169 जणांना कोरोना; चार जणांचा मृत्यू
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत रविवारी (दि. 14) कोरोनाचे 169 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या तीन हजार 903 झाली आहे. चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 118 झाली आहे. 54 जण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 240 झाली आहे.
सध्या नवी मुंबईतील पालिका तसेच विविध खासगी रुग्णालयांत सद्यस्थितीत एक हजार 545 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 9, नेरुळ 22, वाशी 17, तुर्भे 25, कोपरखैरणे 23, घणसोली 24, ऐरोली 46, दिघा 3असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे. तर ऐरोलीत सलग दुसर्या दिवशी 46 रुग्ण सापडल्याने 191 पैकी 87 रुग्ण या दिन विभागात सापडले आहेत. त्यामुळे कधी नव्हते ते नेरुळ व ऐरोलीत चिंता वाढली आहे.