जासई : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय मजकूर संघाचे उपाध्यक्ष व कामगार नेते स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अतुल पाटील, महेंद्र घरत, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अरुणशेठ जगे, शाळचे सेवक, सर्व हितचिंतक, सर्व सल्लागार समिती सदस्य यांनी दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पुजन केले. तसेच त्यांच्या पालखीस सर्व मान्यवरांनी खांद्यावर घेऊन संपूर्ण जासई गावात लेझीम, ढोल सह भव्य गजराम मिरवणूक काढली. मिरवणुकीनंतर जेएनपीटी, सिडको,प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने शाळांतर्गत घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, रांगाळी यासर्व स्पर्धेच्या प्रथम तीन क्रमांकांना सन्मानित केले. या वेळी अमृत ठाकूर, अशोक पाटील, अविनाश पाटील, कृष्णा म्हात्रे, सभापती नरेश घरत, प्रभाकर मुंबईकर, गणेश पाटील, यशवंत घरत, जासई सरपंच संतोष घरत आदी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.