Breaking News

पेझारी, श्रीगाव येथे शिवजयंती जल्लोषात

श्रीगाव : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे शिवभक्त पेझारी यांच्या वतीने दि. 23 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजेच शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना शिवभक्त पेझारी तर्फे व उपस्थित शिवभक्तांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. रायगड किल्ल्यावरून पेटती मशाल (शिवज्योत)चे सकाळी 5 वाजता पेझारी येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी

महाराजांची भव्य मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते झाला.  प्रिन्स तुरे या बालकलाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांची साजेशी भूमिका साकारली होती. शिवभक्त पेझारी यांना मुस्ताक औसेकर (श्रीगाव) यांच्या वतीने टी-शर्टचे वाटप करण्यात आले. सायंकाळी शिवचरित्रावर कृष्णा भगत (पेझारी) यांचे व्याख्यान झाले, देहेन येथील सामुदायिक हरिपाठ, ओमकारेश्वर पेझारी यांचे भजन आदी कार्यक्रम पार पडले. या शिवजयंती सोहळ्यात हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. श्रीगाव येथे मर्दमराठा मंडळातर्फे शिवजयंती साजरी श्रीगाव, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील मर्दमराठा मंडल व श्रीगाव मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खालुबाजाच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये लाठी-काठी मंडल भोनंग (अलिबाग) यांनी उत्तम कवायती करून मिरवणुकीस रंगत आणली.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply