Breaking News

तळोजा परिसरात इमारतीला आग

बालकासह परिवाराचे जवानांनी वाचवले प्राण

पनवेल : वार्ताहर

तळोजा येथील एका इमारतीत रविवारी (दि. 19) लागलेल्या आगीत नऊ महिन्यांच्या बालकासह त्याचा परिवार जवळपास एक तास आत अडकला होता. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले.

तळोजा फेज-1 से.-11 येथे एके प्लाझा या इमारतीच्या सातव्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यामुळे संपूर्ण इमारत धुराच्या लोटांनी भरली होती. खालच्या मजल्यावरील सर्व रहिवाशांनी तत्काळ इमारत खाली केली. परंतु नवव्या मजल्यावर राहणार्‍या नऊ महिन्यांच्या बालकासह त्याचा परिवार यात अडकून पडला होता. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संकटकाळी बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे करून आगीवर नियंत्रण मिळवले व या परिवाराला एक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply