Breaking News

कोविड योद्धे बनून काम करा : रामदास आठवले

पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या जैविक महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. आपल्या राज्यासह देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता सर्वांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. नियम पाळा व कोरोनाला टाळा तसेच या संकटात कोविड योद्धे बनून काम करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष  रामदास आठवले यांनी केले. 

सुधागड तालुक्यातील परळी नगरीत ना. रामदास आठवले यांचे आगमन झाले असता रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. या ठिकाणी पक्षाचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदिश गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष रवींद्रनाथ ओव्हाळ, रिपाइं सुधागड तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, कार्याध्यक्ष भगवान शिंदे, युवक अध्यक्ष निशांत पवार, श्रेयस भालेराव, संदेश शिंदे उपस्थित होते. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादू गायकवाड यांनी ना. आठवले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ग्रामपंचायत परळीच्या वतीने सरपंच संदेश कुंभार यांनीही स्वागत केले. या वेळी ना. आठवले यांनी सुधागडसह जिल्ह्याची कोरोनाविषयीची परिस्थिती जाणून घेतली आणि काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला सर्वांना दिला.

पालीतदेखील ना. आठवले यांचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी माजी तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, उपाध्यक्ष दीपक गायकवाड, सुनील गायकवाड, नितेश गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते एम. वाय. गायकवाड, महादू ओव्हाळ, सुनील गायकवाड, सचिन गायकवाड, जितेश गायकवाड, महेंद्र गायकवाड, सुशील गायकवाड, अक्षय गायकवाड, संतोष साळुंखे, नितेश पवार, परळी विभागप्रमुख राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply