
पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेत 41 विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, 24 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर 15 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे. वाणिज्य शाखेत 62 विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, 20 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर 35 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे.
वाणिज्य विभागात राधिका सुनील अरगडे 554 (85टक्के) गुण मिळवून पहिली, नेहा जनार्दन जगताप 553 (85 टक्के) गुण मिळवून दुसरी, तर सौरव संजीव शर्मा 519 (80 टक्के) गुण मिळवून तिसरा आला आहे. विज्ञान विभागात शिवानी पावने 529 (82 टक्के) गुण मिळवून पहिली, अशेर चित्तीलापील्ले 494 (76 टक्के) गुण मिळवून दुसरा, तर अनुराग कृष्णामुरारी मिश्रा 478 (73.50 टक्के) गुण मिळवून तिसरा आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गव्हाण येथील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश
गव्हाण : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 16) इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी (एचएससी) परीक्षा फेब्रुवारी 2020 चा निकाल कॉमर्स विभागाचा 100% व कला विभागाचा 91. 65% लागला.
यात वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक सेजल ठाकूर 81.38%, द्वितीय क्रमांक पायल मोकल 77.23%, तृतीय क्रमांक साक्षी ठाकूर 74.62%, तर कला शाखेत प्रथम क्रमांक ज्योती टेकुडे 68.30%, द्वितीय क्रमांक रसिका घरत 66.92%, तृतीय क्रमांक मानसी डोलकर 65.08% असा आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. विद्यालयाचे आधारस्तंभ रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर, विश्वनाथ कोळी, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, संस्थेचे आजीव सदस्य प्रमोद कोळी, आजीव सभासद रविंद्र भोईर, ज्युनिअर कॉलेज विभागाचे प्रमुख प्रा. बी. पी. पाटोळे, सर्व ज्युनिअर कॉलेज शिक्षक, माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक आणि पंचक्रोशीतील पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेही हार्दिक अभिनंदन केले आहे.