Breaking News

मुरूड समुद्रकिनारी कचर्याचे साम्राज्य

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड समुद्रकिनारी कचर्‍याचे साम्राज्य झाले असून, समुद्राच्या जोरदार भरतीमुळे समुद्रातील कचरासुद्धा मोठ्या प्रमाणात किनार्‍यावर आला आहे. त्यामुळे जिथे पहावे तिथे कचराच कचरा दिसत आहे

कोरोना विषाणूमुळे संचारबंदी असल्याने सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ मुरूड या ठिकाणी पर्यटक येत नसल्याने समुद्रकिनारे सुनसान झाले आहेत, परंतु स्थानिक नागरिक या ठिकाणी येत असतात त्यामुळे त्यांना या कचर्‍याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्लास्टिक व काचेच्या रिकाम्या बॉटल्स, झाडांचा पालापाचोळा असा सर्रास कचरा जिथे-तिथे पहावयास मिळत आहे. समुद्र किनारी कचरा नगर परिषदेमार्फत उचलण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत

मुरूड समुद्रकिनारी ज्या वेळी पर्यटक येत होते त्या वेळी येथील कचरा व्यवस्थितपणे उचलला जात होता, परंतु संचारबंदीमुळे पर्यटकांचे येणे थांबल्याने नगर परिषदसुद्धा या ठिकाणी कचरा उचलत नसल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समुद्रकिनारी पडलेला हा जा अस्ताव्यस्त कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply