Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून महास्वच्छता अभियानाची पाहणी

पनवेल ः प्रतिनिधी

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कामोठ्यात शुक्रवारी (दि. 7) स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या वतीने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत कामोठे येथे उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान पार पडले. या अभियानात प्रभाग समिती ‘क’चे सभापती गोपीनाथ भगत, नगरसेवक अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विकास घरत, प्रदीप भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, राजेश गायकर, रवि गोवारी, गणेश भगत, कामोठे महिला मोर्चा चिटणीस वनिता पाटील, उपाध्यक्षा वर्षा शेलार, सदस्य सुरेखा लाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते आर. जी. म्हात्रे, विठोबा गायकर, नंदा पाटील, हर्षदा तुपे, श्रुती देवरुकर यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply