Breaking News

जय हनुमान सर्वे संघ विजेता

रेवदंडा : प्रतिनिधी

मुरूड तालुक्यातील सर्वे येथे फणसाड भूमिपुत्र मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गावातीलच जय हनुमान क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले. मुरूड संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला.

या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील अंतिम सामना सर्वे विरुद्ध मुरूड असा रंगतदार झाला. यात सर्वे संघाने मुरूड संघाला धूळ चारून विजेतेपदावर नाव कोरले. विजेत्या संघाच्या निखिल धार्वे याने सर्वोकृष्ट फॉर्म दाखवित उत्कृष्ट फलंदाज व अंतिम लढतीतील सामनावीराचा बहुमान प्राप्त केला; तर मुरूडच्या प्रणित धार्वे याची स्पर्धेतील उत्कृष्ट गोलदांज व मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.

भूमिपुत्र मंडळाच्या वतीने उपस्थित महिलांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष वैभव खैरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply