Breaking News

चिरनेरच्या पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळांचा 100 टक्के निकाल; मुलींनी मारली बाजी

चिरनेर ः वार्ताहर

पी. पी. खारपाटील चिरनेर येथील एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

ठकूबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यम स्कूलमधून सानिका सागर जोशी 92.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली, तर हितैशी प्रभाकर भोईर (89.20 टक्के) आणि दक्षता मनोज म्हात्रे (88.40) या दोघी अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या.

परशुराम धाकू खारपाटील मराठी माध्यमिक विद्यालयात श्रेया मंगेश ठाकूर 95.60 टक्के गुण मिळवून प्रथम, श्रेया विकास भगत व तेजस्विनी राजन म्हात्रे या दोघी 87 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि मोहिनी हरिश्चंद्र कनवटे 84.60 टक्के गुण मिळवून तिसरी आली.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक पी. पी. खारपाटील, उपाध्यक्ष राजेंद्र खारपाटील, सचिव समीर खारपाटील, सहसचिव सागर खारपाटील, प्रशासकीय अधिकारी आर. एन. पाटील, प्राचार्य सुरदास राऊत, मुख्याध्यापिका मंदा घरत, पर्यवेक्षक आनंद चिर्लेकर, स्मिता मसुरकर, तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply