Breaking News

कळंबोलीत नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

कळंबोली येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2021 या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. अशोक सुरळकर, राजेंद्र बनकर आणि पांडुरंग ढेरे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी स्व. अशोक सुरळकर, राजेंद्र बनकर व पांडुरंग ढेरे यांना श्रद्धांजली वाहिली.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply