Breaking News

कळंबोली, रोहा भाजप युवा मोर्चाकडून श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना

पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 27) कळंबोली मंडळ युवा मोर्चा तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले 1000 पत्रके पोस्टाद्वारे त्यांच्या मुंबईच्या निवास्थानी पाठवण्यात आले आहेत.

शरद पवार हे मोठे सन्माननीय नेते आहेत. परंतु प्रभू रामचंद्राच्या विषयात असे नाकारात्मक कोणी बोलणार असेल तर प्रभू रामाची आठवण देण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चा करत राहणार. यावेळीस रायगड जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमर ठाकूर, जमीर शेख, कळंबोली युवा मोर्चा अध्यक्ष गोविंद झा, श्रीकांत ठाकूर, गौरव नाईक, अझर शेख, दीपेश परब, निशान गिल, जोबान सिंग व इतर युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.

धाटाव : प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चुकीच्या विधानाने रामभक्त दुखावले आहेत. महाराष्ट्रासह देशभरातून प्रभु श्रीराम भक्तांनी ठिकठिकाणी शरद पवार याच्या चुकीच्या वक्तव्य निषेधार्थ आंदोलने केली गेली. श्रीरामाचे मंदिर बांधुन कोरोना जाणार आहे का? अशा शब्दांत  केलेल्या विधानाचच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा आवाहनानुसार भाजप व युवा मोर्चाच्या वतीने रोहा तालुक्यातून लाखो जय श्रीराम लिखित पत्र शरद पवारांच्या घरी रवाना केले गेले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे रायगड जिल्ह्या अध्यक्ष अमित घाग याच्या माध्यमातून रोहा माजी नगराध्यक्ष संजय कोणकर व तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस दिपक भगत यांच्या नेतृत्वाखाली  जय श्रीराम लिहिलेले पत्र तालुक्यातील ठिकठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये टाकण्यात आले. या पुढेही हजारो पत्र पाठवले जाणार असल्याचे कार्यकर्ते यांनी सांगितले.

या वेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व रोहा माजी नगराध्यक्ष संजय कोणकर, सह्याद्री पथसंस्थेचे चेअरमन विलास डाके,  युवा मोर्चा तालुका सरचिटणीस दिपक भगत, रोहा शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष सार्थक जाधव, भाजप युवा मोर्चाचे उप अध्यक्ष अमरदिप म्हात्रे, सोशल मिडिया सनिल ईगांवले, युवा कार्यकर्ते विशाल टेंबे यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply