Breaking News

खोपोली नगरपालिकेची संरक्षक भिंत कोसळली

जीवितहानी नाही, मात्र भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान

खोपोली : प्रतिनिधी

सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास खोपोलीत नगरपालिकेची संरक्षक भिंत कोसळली. पोलीस ठाणे व भाजी मार्केटदरम्यान ही संरक्षक भिंत होती. सात दुचाक्या व 10 ते 12 साहित्य ठेवलेल्या हातगाड्या या भिंतीखाली आल्याने भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. पहाटेची वेळ असल्याने जीवितहानी मात्र टळली. संरक्षक भिंत कोसळल्याची माहिती मिळताच खोपोली नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक, सामाजिक कार्यकर्ते व भाजी विक्रेत्यांनी ढिगार्‍याखाली अडकलेल्या दुचाकी व हातगाड्या काढण्यासाठी मेहनत घेतली. या वेळी झालेल्या नुकसानीची भरपाई कोण व कधी देणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त भाजी विक्रेत्यांनी केला. नगरपालिका प्रशासन यासंबंधी सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन नगरसेवक मोहन औसरमल यांनी दिले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply