Breaking News

पनवेल तालुक्यात 198 जण पॉझिटिव्ह

एकाचा मृत्यू; 168 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 27) कोरोनाचे 198 नवीन रुग्ण आढळले असून 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 46 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 48 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1053 झाली आहे. कामोठेमध्ये 42 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1262 झाली आहे. खारघरमध्ये 33 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1169 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 26 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1011 झाली आहे. पनवेलमध्ये 24 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1161 झाली आहे. तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 367 झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल 20, नवीन पनवेल 43, कळंबोली 11, कामोठे सहा, खारघर 40 असा विभागवार समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 6023 रुग्ण झाले असून 4445 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.80 टक्के आहे. 1428 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागामध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे सहा, सुकापूर पाच, गिरवले चार, करंजाडे तीन, पळस्पे तीन, आदई, चावणे, डेरवली, रिटघर, ठोंबरेवाडी-खानावळे येथे प्रत्येकी दोन, आजिवली, बोर्ले, चिंचपाडा-वडघर, गव्हाण, गुळसुंदे, जांभीवली, कराडे खुर्द, नेरे, पारगाव, सवणे, शिरढोण, शिवकर, उसर्ली, वलप, विचुंबे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर विहीघर येथील एकाचा दि. 25 रोजी मृत्यू झालेला असून त्याचा  अहवाल सोमवारी प्रात्प झाला. ग्रामीण भागात 387 रुग्ण उपचार घेत आहेत.

उरण तालुक्यात 18 रुग्णांची भर

दोघांचा मृत्यू; सहा जणांना डिस्चार्ज

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात सोमवारी कोरोनाचे 18 रुग्ण आढळले असून दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सहा रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंगरी दोन, मोठे भोम हनुमान मंदिराजवळ, नवापाडा करंजा, करंजा दळवी हॉस्पिटल जवळ, भेंडखळ, बोरखार बोरीचा कोठा, धुतुम, राघोबा तिसाई मोबाईल जवळ, रांजणपाडा जासई, सोनारी, मोरा कोळीवाडा राम मंदिरजवळ मोरा, हनुमान मंदिर नवापाडा करंजा, फुंडे, राजिप शाळा जांभूळपाडा जासई, श्रीराज नगर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये गणेश नगर करंजा दोन, धुतुम, खोपटे, नागाव, भेंडखळ प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर करंजा व टाईप 2 114 बोकडवीरा येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 805  झाली आहे. त्यातील 610 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 171 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे, अशी महिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे  यांनी दिली.

रोहा तालुक्यात नऊ जणांना कोरोनाची लागण

रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात सोमवारी कोरोनाचे नऊ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्याची कोरोनो रुग्णांची एकुण आता पर्यंतची संख्या 495 वर पोहचली आहे. 18 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने बरे झालेल्या व्यक्तींची संख्या 344 एवढी झाली आहे आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरात पाच व ग्रामीण भागात चार रुग्ण आढळले आहेत. या मध्ये पाच महिलांचा व चार पुरुषांचा समावेश आहे. यात 15 वर्षीय अतील दोन मुलींचा समावेश आहे. माधव आश्रम छत्रपती शिवाजीनगर तीन, कासारआळी अष्टमी दोन, श्रीकृष्णनगर भुवनेश्वर, आंबीवली, कुंदननगर गणेशनगर भुवनेश्वर, जीवनधारा कॉलनी वरसे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत 11 व्यक्तींना कोरोना संसर्गमुळे आपला प्राण गमवावे लागले आहे. आता 140 सक्रीय कोरोना बाधीतांवर विविध ठिकाणी उपचार चालु आहेत.

महाडमध्ये 33 रुग्ण कोरोनामुक्त

महाड : प्रतिनिधी – महाड करांसाठी खर्‍या अर्थाने दिलासा देणारी घटना घडली आहे. सोमवारी कोरोनावर उपचार घेणारे 33 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर नव्याने 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये कांबळे तर्फे बिरवाडी 47 वर्षीय पुरुष, पिडीलाईट सोसाटी 28 व 51 वर्षीय पुरुष, 45, 55 व 19 वर्षीय स्त्री, काकरतळे महाड 27 वर्षीय पुरुष, प्रिव्ही कॉलनी नांगलवाडी 52 वर्षीय पुरुष, कोटेश्वरीतळे महाड 58 व 18 वर्षीय पुरुष, सावळाराम कॉलनी महाड 12 वर्षीय स्त्री यांचा समावेश आहे. महाड येथे 150 रुग्ण उपचार घेत असुन, 189 रुग्ण बरे झाले आहेत, तर आजपर्यंत 359 रुग्णांची नोंद झाली आहे.महाड तालुक्यातील कोरोनाचे उपचार घेणारे 33 रुग्ण पुर्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर जगताप आणि महाड आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार आणि त्यांचे सकारी कर्मचारी जे आपला जिव धोक्यात घालून कोरोनावर उपचार देत आहेत त्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने हे शक्य झाले आहे.

कर्जत तालुक्यात 13 नवे रुग्ण

कर्जत : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यात सोमवारी कोरोनाचे 13 रुग्ण आढळले असून आजपर्यंत तालुक्यात 443 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे व  324 जणांनी कोरोनावर मात केली आहे.आढळलेल्या रुग्णांमध्ये चार रुग्ण कर्जत नगरपरिषद हद्दीतील असून एक रुग्ण माथेरान नगरपरिषद क्षेत्रातील आहे आणि आठ तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत.

नवी मुंबईत 314 कोरोनाबाधित

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी 314 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने बधितांची एकूण संख्या 13 हजार 932 झाली आहे. तर दिलासादायक बाब अशी की, 311 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या नऊ हजार 141 झाली आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 394 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांच्या विभागवार आकडेवारीत बेलापूर 43, नेरुळ 69, वाशी 36, तुर्भे 33, कोपरखैरणे 81, घणसोली 26, ऐरोली 22, दिघा 4 असा समावेश आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply