Breaking News

देऊळ बंद; शिवभक्तांनी घेतले बाहेरून दर्शन

मुरूड : प्रतिनिधी
कोरोनामुळे मंदिरे अद्याप बंद असल्याने श्रावणातील पहिल्या सोमवारी (दि. 27) भाविकांना शिवलिंगाचे थेट दर्शन घेता आले नाही. त्यामुळे शिवभक्तांनी मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले.
श्रावण महिना पवित्र मानला जातो. या मासात श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा, अभिषेक करण्यात येतो. श्रावणातील सोमवार व शनिवारी तर मंदिरांसमोर रांगा लागतात. पहिल्या श्रावणी सोमवारी मात्र शिवभक्तांची निराशा झाली. कोरोनाचा प्रादुभार्व लक्षात घेता लॉकडाऊनपासून बंद झालेली मंदिरे अजूनही उघडली नसल्याने भाविकांना गाभार्‍यात जाऊन पूजा करता आली नाही. तरीही ग्रामीण भागात लोकांनी सोशल डिस्टन्स पाळून मंदिराबाहेरून मनोभावे दर्शन घेतले आणि कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना शिवशंभूकडे केली.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply