पनवेल : रायगड जिल्ह्यात 398 नव्या कोरोना रुग्णांची नोंद बुधवारी (दि. 29) झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 119, ग्रामीण 43) तालुक्यात 162, पेण 54, अलिबाग व महाड प्रत्येकी 31, खालापूर 30, रोहा 21, उरण व कर्जत प्रत्येकी 18, माणगाव 12, श्रीवर्धन आठ, म्हसळा सहा, सुधागड पाच आणि पोलादपूर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल, उरण व रोहा तालुक्यात प्रत्येकी दोन आणि कर्जत तालुक्यात एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 374 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 14937वर पोहोचला असून, मृतांची संख्या 387 इतकी झाली आहे. जिल्ह्यात 10609 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने सध्या 3477 रुग्ण सक्रिय आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper