चार जणांचा मृत्यू; 191 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 1) कोरोनाचे 180 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका दिवसभरात 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 143 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 37 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 48 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 6 श्रीजी अपार्टमेंट आणि कळंबोली सेक्टर 10 सी मधील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 42, कामोठेमध्ये 26, खारघरमध्ये 36 नवीन पनवेलमध्ये 24, पनवेलमध्ये 12, तळोजामध्ये तीन नवीन रुग्ण आढळले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 6771 रुग्ण झाले असून 5300 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.27 टक्के आहे. 1304 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये करंजाडे 10, उलवे आठ, विचुंबे दोन, गुळसुंदे दोन, विहीघर, साळवे, नितळस, नेरे, नारपोली, नांदगाव मोहो, कोंबडभुजे, कापस, चिपळे, बोर्ले, बेलपाडा, आकूर्ली, वहाळ आणि सुकापुर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला असून 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीण कोरोना पॉझिटिव्हची संख्या 2125 झाली असून 1691 जणांनी कोरोनावर मात केली असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 18 नवे रुग्ण
उरण : उरण तालुक्यात शनिवारी कोरोना पॉझिटिव्हचे नवे 18 रुग्ण आढळले व 20 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांत जसखार दोन, फुंडे दोन, कोटनाका उरण, करंजा, करंजा नवापाडा, दिहोना हाऊस मस्जिद मोहल्ला, उरण रोड मच्छी मार्केट, आवरे गणपती मंदिर जवळ, जांभूळपाडा कुलदेवी मंदिर जासई, जेएनपीटी उरण, केगाव जुन्या पाण्याच्या टाकीजवळ, मुळेखंड, बदामवाडी उरण,जांभूळपाडा जासई, वेश्वी, धुतुम येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
पोलादपूरमध्ये 12 नव्या रुग्णांची नोंद
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात शनिवारी 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आढळलेल्या रुग्णांत सडवली, कापडे आणि दिविल, पोलादपूर बाजारपेठ येथे प्रत्येकी एक तर नगरपंचायत कर्मचारी गणेशनगर येथील रहिवासी व त्यांचे कुटूंबिय चार, तहसील कार्यालयामधील कर्मचारी दोन तसेच कोतवाल येथील दोन व्यक्तींचा समावेश आहेत. एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. तर पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 77 झाली असून 60 बरे झाले असून 10 रुग्ण उपचार घेत आहे.
नवी मुंबईत 342 कोरोनाबाधित
नवी मुंबई : नवी मुंबईत शनिवारी 342 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर 204 जण कोरोनामुक्त झाले. तसेच दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.नवी मुंबईतील कोरोना बधितांची एकूण संख्या 15 हजार 727 तर बरे झालेल्यांची 10 हजार 569 झाली आहे. एकूण मृतांची संख्या 425 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 37, नेरुळ 75, वाशी 58, तुर्भे 20, कोपरखैरणे 61, घणसोली 40, ऐरोली 46, दिघा 5 अशी आहे.
महाडमध्ये 37 नवे पॉझिटिव्ह
महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यात शनिवारी नव्याने 37 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एक रुग्ण उपचारादरम्यान बरा झाला आहे. राजेवाडी येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये कांबळे तर्फे बिरवाडी आठ, पिडीलाईट कॉलनी चार, अप्परतुडील दोन, काळीज दोन, रेणुकानिवास प्रभात कॉलनी, गोमुखेआळी, अकांक्षा अपार्टमेंट काकरतळे, राजेवाडी, अरुणनगर नांगलवाडी, बीएसबुटाला काकरतळे, गितांजली बंगलो नांलवाडी, तांबडभुवण, शारदाकॉम्प्लेक्स बिरवाडी, सावित्री नवेनगर, सेवयानी हॉस्पिटल जुना पोस्ट, अष्टविनायक चवदारतळे, खानवली बिरवाडी, प्रथमेश अपा.तांबडभुवन, बिरवाडी, मोहल्ला, विठ्ठल रखुमाई, कोळोसे, किंजळघर, मधली आळी वसंत, शिंदेकोंड येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
कर्जत तालुक्यात नऊ जणांना लागण
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यात शनिवारी नऊ कोरोना रुग्णांची नव्याने भर पडल्याने रुग्ण संख्या 514 वर गेली असून 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आत्तापर्यंत मृत झालेल्या रुग्णांची संख्या 19 वर पोहचली आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये कर्जत बाजार पेठेत 55 वर्षीय व्यक्ति, दहिवली विभागात 21 वर्षीय तरुण, भिसेगाव भागातील क्रांती नगरमधील 20, 25 व 28 वर्षीय युवक, बोपेले येथील राधाकृष्ण धाम मध्ये वास्तव्यास असलेला 30 वर्षीय तरुण, कोषाणे येथील 59 वर्षीय व्यक्ती, गुंडगे येथील उद्यमनगरमध्ये राहणारी 40 वर्षीय महिल, तसेच याच भागातील गजानन पार्कमध्ये वास्तव्यास असलेला 31 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.