दिव ग्रामस्थांचा प्रवेश
रेवदंडा : प्रतिनिधी
पूरग्रस्तांना तातडीने घरे देण्याचा निर्णय घेणारे, जनतेचे प्रश्न समजून घेणारे व सर्वसामान्याचा विकास साधणारे भाजपचे संवेदनशील सरकार असल्याचे प्रतिपादन भाजप अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी बुधवारी (दि. 21) दिव (ता. रोहे) येथे केले. रोहा तालुक्यातील कोकबन ग्रामपंचायत हद्दीतील दिव ग्रामस्थांनी बुधवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी गावातील मंदिरात झालेल्या कार्यक्रमात अॅड. महेश मोहिते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. केंद्र व राज्यातील सरकार सर्वांना बरोबर घेऊन सर्वांचा विकास करणारे असल्याचे अॅड. मोहिते यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा विकास साधला जाईल, अशी ग्वाही अॅड. मोहिते यांनी या वेळी दिली. रोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, भाजपचे अलिबाग तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, विधानसभा रोहा क्षेत्र अध्यक्ष राजूदादा इंदुलकर, महादेव जोशी, सचिन भोपी आदींचीही या वेळी समयोचित भाषणे झाली. त्यानंतर दिव ग्रामस्थ व महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत अॅड. महेश मोहिते यांनी केले.
माजी सरपंच गोवर्धन पाटील, रोहा तालुका भाजयुमो अध्यक्ष सुदर्शन गावडे, महेश मानकर, ईश्वर नाईक यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच दिव ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धोंडखार ग्रामपंचायत सदस्य शंकर दिवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पेणमधील दिव्यांगही सामील
पेण : प्रतिनिधी
भाजपचे नेते व माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अपंग सामाजिक संस्थेचे पेण अध्यक्ष अखिल पठाण यांच्यासह त्यांच्या 25 सहकार्यांनी गुरुवारी (दि. 22) भाजपमध्ये प्रवेश केला. रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष अखिल पठाण यांच्यासह अपंग सामाजिक संस्थेचे सदस्य महानंदा जयेंद्र म्हात्रे (सोनखार), काशिनाथ धर्माजी पाटील (रावे), पोसु महादेव पाटील (दादर), ज्ञानेश्वर बुधाजी म्हात्रे (दादर), धर्माजी मंगळ्या नाईक (दादर), बाबुराव गणा मोकल (कळवे), पांडुरंग नथुराम काडगे (जांभोशी), बामा बाळकृष्ण पाटील, रामचंद्र सुका पाटील, बाबुराव महादेव पाटील, रेणुका राजाराम पाटील, महादेव सुकली पाटील, अजय बाबुराव पाटील, सलोनी नवनाथ पाटील, काशिनाथ गणपत म्हात्रे, संतोष नारायण पाटील (सर्व रा. रावे), शांताबाई मारुती म्हात्रे, अंजनी चंद्रकांत पाटील, शारदा नागाजी म्हात्रे, शांता रामभाऊ म्हात्रे, सुरेश शंतुराम म्हात्रे, सिंधु सुरेश म्हात्रे, मिथुन रवींद्र पाटील, (सर्व रा. भालविठ्ठलवाडी), देवेंद्र बाळाराम भोईर, जयेंद्र रघुनाथ मोकल (रा. कोपर) यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.