Breaking News

भारतीय जनता युवा मोर्चाने आजीबाईंना मिळवून दिला आसरा

खारघर : रामप्रहर वृत्त – पोटच्या पोराने दीड महिन्यांपासून रस्त्यावर टाकून दिलेल्या एका आजीला भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकार्‍यांनी आसरा मिळवून दिला आहे. तसेच तिला तिच्या घरी सुखरुप पोहचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंब्रा-पनवेल मार्गावरील टोल नाक्यावर शोभबाई बबन चिन्हे नामक आजीबाई अत्यंत हालाखीच्या स्थितीत राहत असलेल्या भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष विनोद घरत यांना दिसल्या होत्या. त्यांनी आपुलकीने आजींच्या जवळ जात चौकशी केली तर भयानक वास्तव समोर आले. आजी बाईंना त्यांचा मुलगा असाच सोडून गेला होता. आजीबाई दीड महिन्या पासून त्याच ठिकाणी होत्या. त्यांनी नाव व मुलाचे नाव सांगून शहाड फाट्याजवळ गेगाव नाका इथल्या असल्याचे सांगितले.

कोरोनाच्या काळात आपल्या आईला मुलगा अशा अवस्थेत सोडून गेला असल्याने तत्काळ विनोद घरत यांनी पनवेल मनपाचे उपायुक्त जमीर लेंगरे यांच्याशी संवाद साधत ही घटना सांगत आजीबाईंची राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. यावेळी उपायुक्तनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आजीबाईना निवारा मिळेल, असे सांगितले.

शनिवारी (दि. 1) आजी शोभाबाई बबन चिन्हे यांना सुखरूप खारघरमधील भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले. या वेळी विनोद घरत यांच्यासह उपाध्यक्ष शुभ पाटील, आणि कार्यकर्ते  रितेश रगुराज, संजय पाटील सर्व कार्यकर्ते तसेच ट्रस्टचे अध्यक्ष मधुसूदन आचार्य, आणि तळोजा पोलीस स्टेशनचे पीआय भरत पाटील, पोलीस शिपाई राज मुंडे सर्व उपस्थित होते.

आजीबाईंना त्याचा घरी सुखरूप पोहचविण्याचे भाजप युवा मोर्चाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे या आजीबाईबाबत कोणास काही माहिती असेल तर विनोद घरत भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष (खारघर तळोजा मंडळ) मोबाइल नंबर : 97693 88080 येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply